प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यात आज गुरुवारी १४ जण कोरोना बाधित असल्याचा अहवाल तालुका आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला असून पिंपळनेर, भोसरे, मोडनिंब, निमगांव टें, टेंभुर्णी, कव्हे, मुंगशी, कुर्डुवाडी येथे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
तालुक्यात एकूण २४० पैकी ९१ जणांची अॅन्टीजेन टेस्ट तर १४९ जणांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली होती. त्यापैकी आज पिंपळनेर येथे २, भोसरे येथे १,मोडनिंब येथे १,निमगांव टें येथे १, टेंभुर्णी येथे २,कव्हे येथे १,मुंगशी येथे १ तर कुर्डुवाडी येथे ५ असे १४ जण कोरोना बाधित आढळले आहेत. आठ जणांची प्रकृती ठिक असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसात कुर्डुवाडीत रुग्ण संख्या वाढत आहे ही चिंतेची बाब आहे. तरी नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. बाहेर पडताना तोंडाला मास्क लावावा, हाथ स्वच्छ धुवावेत, सॅनीटायझरचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.