मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांची माहिती
बरे झाल्याने 10 रुग्णांना सोडले घरी
तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहारात सोमवारी नव्याने फक्त 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर उपचार घेऊन बरे झाल्याने 10 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी दिली.
सोलापूर शहरात सोमवारी 44 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 38 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 6 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 4 पुरुष तर 2 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9425 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 90285
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 9425
प्राप्त तपासणी अहवाल : 90262
प्रलंबित तपासणी अहवाल : 23
निगेटिव्ह अहवाल : 80837
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 526
रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या : 433
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 8466