तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहारातील शुक्रवारी उपचार घेऊन बरे झालेल्या 118 रुग्णांना घरी सोडण्यात आले, तर नवे 70 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी दिली.
सोलापुर शहरात शुक्रवारी 1257 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 70 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 1186 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 70 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 42 पुरुष तर 28 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6885 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 67697
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 6885
-प्राप्त तपासणी अहवाल : 67513
-प्रलंबित तपासणी अहवाल : 184
-निगेटिव्ह अहवाल : 60628
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 425
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 619
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 5841