तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहारात बुधवारी नव्याने 72 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर उपचारादरम्यान 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच बरे झाल्याने 54 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
सोलापूर शहरात आज 457 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 72 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 385 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 72 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 46 पुरुष तर 26 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 7,217 झाली आहे.
-एकूण तपासणी व्यक्ती : 69903एकूण पॉझिटिव्ह रुग्ण : 71,217
-प्राप्त तपासणी अहवाल : 69851
-प्रलंबित तपासणी अहवाल : 52
-निगेटिव्ह अहवाल : 62634
एकूण मृत : 435
-रुग्णालयात दाखल : 820
-एकूण बरे : 5962