प्रतिनिधी / सोलापूर
बाळे तसेच पसिरात दहशत माजवून गंभीर गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार संजीव उर्फं संजय तात्यासाहेब नागनाथ उपाडे (वय 34, रा. संतोष नगर, बाळे, सोलापूर) वर स्थानबध्देतची कारवाई करण्यात आली. जबरी चोरी करणे, दरोडा टाकणे, खुनाचा प्रयत्न करणे, शस्त्राने हल्ला करणे, खंडणी मागणे, बेकायदेशीर जमाव जमवून दगडफेक करणे असे गंभीर गुन्हे आरोपीकडून करण्यात आले आहेत. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुध्द पाच गुन्हे दाखल आहेत. सन 2018 आणि 2020 मध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.
सन 2021 मध्ये त्याने साथीदारासह शस्त्राने दुखापत केली. व जातीवाचक शिवीगाळ केली. वेळोवेळी कारवाई करुनहि आरोपीच्या वर्तनात कोणताच बदल झालेला पोलिसांना दिसून आला नाहि. यामुळे त्याच्यावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.