मेरकॉम इंडिया रिसर्चच्या अहवालात माहिती
नवी दिल्ली ः एप्रिल ते जून 2021 मधील तिमाहीत भारताची सौरऊर्जा उत्पादन क्षमता 12 पटीने वाढून 2,488 मेगावॅटवर पोहोचली असल्याची माहिती मेरकॉम इंडिया रिसर्चच्या अहवालामधून देण्यात आली आहे.
समीक्षकांनुसार तिमाहीमधील क्षमतेत वृद्धी होत जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीत 2021 मधील 2,090 मेगावॅटच्या तुलनेत ही वाढ 19 टक्क्यांनी अधिकची झाली आहे. आपल्या क्वार्टर 2-2021 इंडिया सोलर मार्केट अपडेटच्या अहवालात ही बाब नमूद केली आहे. वर्ष 2021 च्या दुसऱया तिमाहीत(एप्रिल ते जून 2021) 2,488 मेगावॅट सौर क्षमता प्राप्त केली आहे. ही वाढ वर्षाच्या आधारे 2020च्या दुसऱया तिमाहीत 205 मेगावॅट क्षमतेच्या तुलनेत 1,114 टक्क्यांची वृद्धी प्राप्त केली आहे.
जानेवारी ते जूनची स्थिती
दुसऱया बाजूची स्थिती लक्षात घेतल्यास जानेवारी ते जून 2021 मध्ये देशात 4,578 मेगावॅट (जवळपास 4.5गीगावॅट) सौर क्षमतेत वाढ झाली आहे, जी वर्ष 2020 मध्ये जानेवारी ते जून दरम्यान 251 टक्क्यांची वाढ राहिल्याची माहिती आहे. उत्पादन क्षमता वाढ लक्षणीय राहिली आहे.