नवी दिल्ली
स्टेट बँक कार्ड ऍण्ड पेमेन्ट सर्व्हिसेसचा शुद्ध नफा आर्थिक वर्ष 2021-22 च्या डिसेंबर तिमाहीत 84 टक्क्यांनी वधारुन 386 कोटी रुपयांवर राहिला आहे. मुख्य रुपात कार्ड खर्च वाढल्याने, थकीत कर्जामधील कमतरता आणि अन्य स्रोतापासून प्राप्तीतील उत्पन्न वधारल्याने सदरच्या नफ्यात वाढ नोंदली असल्याची माहिती आहे. कंपनीने एक वर्षाच्या अगोदर समान तिमाहीत 210 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला होता.
एसबीआय कार्डने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार तिमाहीच्या दरम्यान कंपनीचे एकूण उत्पन्न 24 टक्क्यांनी वधारुन 3,140 कोटी रुपयांवर पोहचले आहे. जे वर्ष 2020-21 च्या समान कालावधीत 2,540 कोटी रुपयावर राहिले होते.