ऐतिहासिक सौर दिनदर्शिका असल्याचा संशोधकांचा दावा
इंग्लंडमध्sय आजपासून सुमारे 5 हजार वर्षांपूर्वी ऐतिहासिक स्टोनहेंज कुणी आणि का निर्माण केले होते याचे कोडे अद्याप सुटू शकले नव्हते. परंतु आता बर्नेमाउंट युनिव्हर्सिटीच्या ऑर्कियोलॉजिस्ट प्राध्यापिका टिमोथी ड्रेविल यांनी दगडांनी तयार झालेला हा स्टोनहेंज एकप्रकारचा सौर कॅलेंडर असल्याचा दावा केला आहे. यात 15 दगड एका घोडय़ाच्या नाळेच्या आकारात निर्माण करण्यात आलेले आहेत. वरील आणि बर्हिगत हिस्सा हील स्टोन, स्लाटर स्टोन आणि स्टेशन स्टोनप्रमाणे निर्माण झालेला आहे.
याची साधारण आणि आकर्षक बनावट एका ट्रॉपिकल सोलर ईअरप्रमाणे असून जे 365 दिवसांच्या हिशेबाने तयार करण्यात आले आहे. हे पूर्ण ठिकाण एक महिन्याला फिजिकल स्वरुपात प्रदर्शित करते. तर 24 स्टोनचे सर्कल एक दिवसाला दर्शविते. दीर्घकाळापासून याला एकप्रकारचे ऐतिहासिक कॅलेंडरची गणना करणारे मानले जात राहिले असल्याचे ड्रेविल म्हणाल्या.
हे तुटलेल्या दगडांचा एक समूह अजून जे पूजा करण्याचे स्थळ, मंदिर किंवा दफनभूमी सारखे ठिकाणही असू शकते असे काही लोकांचे मानणे आहे. तर प्राध्यापिका ड्रेविल यांच्यानुसार स्टोनहेंजचे पूर्ण लेआउट सूर्याच्या हालचाली आणि त्याच्या छायेच्या आधारावर वेळेची गणना करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
इतिहासकारांनुसार उन्हाळय़ात हील स्टोनमागे पूर्व-उत्तरच्या दिशेने सूर्य उगवतो. ज्याचे पहिले किरण स्टोनहेंजसमोर पडते. तर हिवाळय़ात स्टोनहेंजच्या मधून सूर्यास्त दक्षिण-पश्चिमेच्या दिशेने पाहिला जाऊ शकतो.
10 दिवसांचा एक आठवडा
स्टोनहेंजनुसार एका आठवडय़ात 10 दिवस असतात. अशाप्रकारचे सौर कॅलेंडर ख्रिस्तपूर्व 3000 वर्षापूर्वी पूर्व भूमध्यसागरीय क्षेत्रात विकसित करण्यात आले होते. इजिप्तमध्ये ख्रिस्तपूर्व 2,700 मध्ये हे कॅलेंडर स्वीकारण्यात आले. ख्रिस्तपूर्व 2,600 या काळा याचा व्यापक वापर होऊ लागला होता.