स्टोरेज मार्केटची विभागणी मेमरी कार्ड, हार्ड डिस्क आणि पेन ड्राईव्ह वर्गवारीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्टोरेज मार्केटमध्ये चार टक्क्यांनी वाढ राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. इंडियन कंझ्युमर स्टोरेज मार्केटने तीन प्रकारांमध्ये विभागणी केली आहे. यामध्ये मेमरी कार्ड, हार्ड डिस्क आणि पेन ड्राईव्हमध्ये समावेश करण्यात आला आहे. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार पहिल्या तिमाहीत सन डिस्क तीन प्रकारात वर्गवारी सर्वात पुढे आहे.
इंडियन कंझ्युमर स्टोरेज फ्लॅश डिव्हाईसेस मार्केट रिव्यूच्या सायबर मीडिया रिसर्चने प्राप्त केलेल्या अहवालानुसार सन डिस्क 73 टक्क्यांच्या बाजारातील हिस्यासोबत लिडर बनली आहे. दुसरीकडे एचपी नॉनब्रँडचा मार्केटमधील वाटा 17 टक्के राहिला आहे.
सीएमआर प्रमुखचे समीक्षक शिप्रा सिन्हा यांनी म्हटल्याप्रमाणे डबल ड्राईव्हची लोकप्रियता फ्लॅश ड्राईव्ह मार्केट वाढल्याने झाली आहे. मार्केटमध्ये मायक्रो एसडी आणि एसडी कार्ड वर्गवारीमध्ये सॅनडिक्स वगळता दुसऱया कोणत्याही ब्रँडने इतके मजबूत योगदान दिलेले नाही.
फ्लॅश ड्राईव्हला सर्वाधिक पसंती
पहिल्या तिमाहीनुसार मार्केटमध्ये 15 टक्क्यांची वाढ झाली आहे. फ्लॅश ड्राईव्हची 64 टक्क्यांसोबत सर्वाधिक हिस्सेदारी राहिली आहे. ज्यामध्ये 45 टक्क्यांच्या वाटय़ासह 32 जीबी स्टोरेजला ग्राहकांनी मोठी पसंती दर्शवली आहे.
दुसऱया लाटेचा प्रभाव
दुसऱया बाजूला डबल ड्राईव्हला अधिकची मागणी वाढली आहे. यामध्ये 2021 पर्यंत फ्लॅश ड्राईव्ह बाजार 10 टक्क्यांपेक्षा अधिकने वाढण्याचा अंदाज आहे. सिन्हा यांच्या माहितीनुसार वर्ष 2021 मधील दुसऱया तिमाहीत कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याने पुरवठा साखळी अडचणीत आली आहे. स्मार्टफोनमध्ये इंटर्नल मेमरीचा वापर वाढला आहे. ज्यामध्ये फ्लॅश कार्ड मार्केट मोठय़ा प्रमाणात संघर्ष कायम राहिला आहे.