वृत्त संस्था/ ग्युडेलाजेरा (मेक्सिको)
2021 टेनिस हंगामातील डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या महिलांच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या पाओला बेडोसाने एकेरीची उपांत्य फेरी गाठताना ग्रीसच्या सॅकेरीचा पराभव केला. दुसऱया एका सामन्यात बेलारूसच्या सॅबेलिनेकाने या स्पर्धेत आपला विजय नोंदविताना पोलंडच्या स्वायंटेकचा पराभव केला.
या स्पर्धेत स्पेनच्या बेडोसाने आपली विजयी घोडदौड कायम राखत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. शनिवारी झालेल्या सामन्यात बेडोसाने सॅकेरीचा 7-6 (7-4), 6-4 असा पराभव केला. हा सामना दोन तास चालला होता. बेलारूसच्या सॅबेलिनेकाने पोलंडच्या स्वायंटेकचा 2-6, 6-2, 7-5 असा पराभव केला. इझा गटातून बेडोसाने उपांत्य फेरी गाठली असून आता तिचा या गटातील तिसरा राऊंड रॉबिन सामना बाकी आहे.