मॅड्रिड
विविध घडामोडींच्या प्रभावामुळे जगभरात हवामान बदल वेगाने होत आहे. यामध्ये काही ठिकाणी अवेळी पाऊस पडणे, जंगलांना आगी लागणे, डोंगराचे होणारे भूस्कलन आदी घटना होत. असा काहीसा बदल स्पेन या देशात झाल्याचे पहावयास मिळाले असून येथे उष्णतेच्या काळात समुद्र किनाऱयांवर लोक निवांत फोटो काढत आपला आनंद व्यक्त करण्यात गुंतलेले असायाचे तर काहीजण पर्यटनामध्ये गुंग असायाचे परंतु सध्या या ठिकाणी वेगाने पडणाऱया बर्फामुळे मॅड्रिड शहरात बर्फाची चादर पाघरल्यासारखी स्थिती प्राप्त झाल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या बदलाने जवळपास मागील 70 वर्षांचा विक्रम मोडीत काढल्याची नेंद केली आहे. यामध्ये 24 तासांमध्ये 20 इंच आकाराचा बर्फाचा खच पडला होता. महापौर कार्यालयाकडून दिलेल्या आकडेवारीनुसार मॅड्रिड शहराला बर्फ वर्षावामुळे जवळपास 12 हजार कोटीचे नुकसान झाल्याची माहिती आहे. कारण सदर बर्फाचास्तर वितळविण्यासाठी आतापर्यंत 7 हजार टन मिठाचा वापर केला आहे. या बदलामुळे आतापर्यंत सर्वात मोठय़ा थंडीचा सामना करावा लागला आहे. स्पेनमधील प्रमुख शहरांपैकी मॅड्रिडसह बर्सिलोना जवळ असणाऱया कोटामधील पारा हा वजा 34 डिग्री, वेगा डी लियोर्ड्स येथे वजा 35.6 इतक्या तापमानाची नोंद मात्र ठेवण्यात आली आहे. या अगोदर 1956 मध्ये पिरिनी माउंटेन रेंजमधील जेनटा तळे हे वजा 32 इतक्या तापमानाची नोंद केली होती. तुफान वेगाने होणाऱया बर्फाच्या माऱयामुळे जवळपास 27 राज्यांना अलर्ट सादर केला आहे.