वृत्तसंस्था/ रेडॉम
येथे सुरू असलेल्या बिली जीन किंग चषक सांघिक महिलांच्या टेनिस स्पर्धेत टॉप सीडेड इगा स्वायटेकच्या शानदार कामगिरीच्या जोरावर पोलंडने रूमानियाचा 3-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. आता येत्या नोव्हेंबरमध्ये या स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे.
या प्रतिष्ठेच्या सांघिक स्पर्धेत पोलंडने पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. पोलंडच्या स्वायटेकने रूमानियाच्या बुझामेस्क्यूचा पहिल्या एकेरी सामन्यात 6-1, 6-0 असा पराभव करत आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. स्वायटेकचा एकेरीतील हा सलग 18 वा विजय होता. शनिवारी झालेल्या एकेरीच्या सामन्या स्वायटेक रूमानियाच्या प्रिस्केरियुचा 6-1, 6-0 असा पराभव करत आपल्या संघाला अंतिम फेरीत नेले. अन्य एका एकेरीच्या सामन्यात पोलंडच्या टेनिसपटूनी रोमानियाच्या खेळाडूवर विजय मिळविला होता.
या स्पर्धेत कझाकस्तानने जर्मनीचा 3-0 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. या सांघिक स्पर्धेत अन्य एका लढतीत झेकप्रजासत्ताकने ब्रिटनवर 2-1 अशी अघाडी मिळविली आहे. बेल्जियमने यापूर्वी सदर स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. इटली, स्पेन आणि अमेरिका यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे.