ग्राम पंचायतीचा निर्णय, घरोघरी जनजागृती
प्रतिनिधी / बेळगाव
वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हंदिगनूर ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात कडक निर्बंध लादण्याचा निर्णय ग्रा. पंचायतीने घेतला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हंदिगनूर ग्राम पंचायतीतर्फे हंदिगनूर, बोडकेनहट्टी, कुरीहाळ गावात ध्वनीक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यात आली. दरम्यान घरो-घरी जाऊन नागरिकांना घरी रहा, सुरक्षित रहा, तोंडावर मास्क वापरा, वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करा, सामाजिक अंतर राखा अशा सूचना करण्यात आल्या.
कोरोनाच्या दुसऱया लाटेने थैमान घातल्याने ग्रामीण भागात देखील कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. याकरिता ग्रा. पंचायतीतर्फे विविध उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत. बाहेरून येणाऱयांना गावात बंदी असून गावातून बाहेर जाणाऱयांवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक गोष्ट म्हणून सकाळी 7 ते 10 यावेळेत किराणा दुकाने तसेच सकाळी व रात्री 8 ते 10 यावेळेत दूध डेअऱया खुल्या ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी ग्रा. पं. मार्फत खबरदारी म्हणून तिन्ही गावांतून सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहनही ग्रा. पं मार्फत करण्यात येत आहे.
याप्रसंगी पीडीओ लिला मेत्री, ग्रा. पं. अध्यक्ष सुरेश जाधव, सदस्य नागेश नाईक, जोतिबा तवनोजी, परशराम जाधव, मारूती तवनोजी, चन्नाप्पा नाईक, निंगाप्पा पूजारी, देवेंद्र भांदुर्गे, शशिकांत सुतार, सेपेटरी सांवी, क्लार्क रामू तळवार यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.