बेळगाव / प्रतिनिधी
हमारा देश संघटनेच्यावतीने हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 5 ऑगस्टपर्यंत इच्छुकांनी नाव नोंदणी करावयाची आहे. स्पर्धेकरीता आदी शंकराचार्य व सीएए- एनआरसी कायद्याचे महत्व असे दोन विषय असणार आहे. एका विषयावर इंग्रजी भाषेत निबंध लिहावयाचा आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व विजेत्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी 9686977601 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.