प्रतिनिधी / रत्नागिरी
मुळ पुण्याचा असलेल्या आदित्य किंजवडेकर यांने राजापूर तालुक्यातील कोंडे येथून ओरायन नेबूलाची छायाचित्र काढली असून समाजमाध्यमांमध्ये या छायाचित्रांचे जगभरातून कौतुक होत आह़े अवकाश निरीक्षण व छायाचित्रे काढण्यासाठी कोकणातील वातावरण सर्वोत्तम असल्याचे त्यांने म्हटले आह़े यामुळे अनेक खगोलप्रेमींची पावले कोकणाकडे वळू लागली आहेत.
ओरायन नेबूला हा पृथ्वीपासून सगळ्यात जवळ असलेला आकाशातील एक तेजोमेघ किंवा ढग आह़े तेजोमेघ म्हणजे असा वायुंचा पुजंका की ज्यामध्ये काही हायड्रोजन आणि हेलियमसारखे वायू बाहेर पडत असतात आणि त्यामध्ये गुरुत्वाकर्षण निर्माण होऊन पुढे यातून तारे वा ग्रह जन्माला येतात. या दृष्टीने ताऱयांचे जन्मस्थळ म्हणून या तेजोमेघांकडे पाहिले जात़े हा मृगतारका समुहातील तेजोमेघ आह़े जो पृथ्वीपासून जवळ आह़े आपल्या आकाशगंगेमध्येच हा तेजोमेघ 1300 प्रकाशवर्ष अंतरावर आह़े हा तेजोमेघ हिवाळ्Îामध्ये साध्या डोळÎांनी दिसू शकतो. मृग नक्षत्र आकाशामध्ये दिसत असते त्यावेळी मृग नक्षत्रातील 3 तारे मध्यमागी दिसतात. या तीन ताऱयांच्या खालच्या बाजूला मध्यभागी असलेल्या तारका समुहामध्ये हा तेजोमेघ पाहू शकतो. याचीच छायाचित्रे टेलिस्कोपच्या सहाय्याने आदित्य याने कोंडÎे येथून टिपली आहेत़
रत्नागिरीमध्येही हौशी आकाश निरीक्षक अशा प्रकारे अवकाश निरीक्षण, छायाचित्रण व नोंदी घेत असतात़ शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या खगोल मंडळातर्फेही असे उपकम विद्यार्थ्यांसाठी राबवले जातात़ काही खासगी संस्था अशा विद्यार्थी व हौशी आकाश निरीक्षकांना प्रोत्साहन देत असतात़
आकाश निरीक्षणाचे उपक्रम शाळांनी राबवावे
कोकणातील वातावरण आकाश निरीक्षणासाठी पोषक आह़े शालेय अभ्यासक्रमांमध्ये पर्यावरण शिक्षणाचा एक भाग म्हणून अशा उपक्रमांना राज्य शिक्षण मंडळाने प्रोत्साहन दिले आह़े आकाश निरीक्षणाचे उपक्रम शाळांनी राबवून विद्यार्थ्यांमध्ये अवकाशाविषयी कुतूहल वाढीस लागण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
– प्रा. श्रीवल्लभ साठे, खगोल अभ्यासक, रत्नागिरी.
नैसर्गिक वातावरण टिकवण्यासाठी प्रयत्न गरजेचे
कोकण आकाश निरीक्षणासाठी खूप चांगले ठिकाण आहे. येथील वातावरण अवकाश छायाचित्रे काढण्यासाठीही उत्तम आह़े असे नैसर्गिक वातावरण टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या कोकणात पायाभूत विकासकामे होत असल्यामुळे प्रदूषण वाढत आह़े याचा परिणाम अवकाश निरीक्षणावर होत़ो
– आदित्य किंजवडेकर, अवकाश छायाचित्रकार