ऑनलाईन टीम / मुंबई :
भारताच्या हरनाझ संधूने मिस युनिव्हर्स 2021 हा किताब पटकावला आहे. इस्रायलच्या इलियट येथे युनिव्हर्स डोममध्ये मेक्सिकोची माजी मिस यूनिव्हर्स एंड्रिया मेजाने हरनाझच्या डोक्यावर हा ताज चढवला. तब्बल 21 वर्षानंतर भारताने हा ताज जिंकला आहे.
युनिव्हर्स ऑर्गनायझेशनच्या ट्विटर अकाउंटवरून व्हिडिओ शेअर करत यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्या व्हिडिओला द न्यू मिस युनिव्हर्स इज इंडिया अशे कॅप्शन देण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये मेक्सिकोची माजी मिस यूनिव्हर्स एंड्रिया मेजा भावुक झालेल्या हरनाझच्या डोक्यावर ताज चढवताना दिसत आहे.
हरनाझ संधू ही मूळची पंजाबची आहे. तिने भारतासाठी 70 वा मिस युनिव्हर्स किताब जिंकला आहे. सुष्मिता सेनने 1994 मध्ये भारताला पहिल्यांदा हा बहुमान मिळवून दिला. त्यानंतर लारा दत्ताने 2000 साली हा किताब पटकवला होता.