ऑनलाईन टीम / चंदीगड :
हरियाणा सरकारने कोरोना रुग्णांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना रूग्णांचे आरोग्य लवकरात लवकर सुधारावे यासाठी हरियाणा सरकार पतंजलीचे एक लाख ‘कोरोनील कीट’ मोफत वाटणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री अनिल विज यांनी ट्विट करत दिली आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, कोरोना रुग्णांची प्रकृती सुधारावी यासाठी आम्ही एक लाख रुग्णांना ‘कोरोनील कीट’चे वितरण करणार आहोत. या कीट साठी होणारा अर्धा खर्च पतंजली तर उरलेला अर्धा खर्च हरियाणा सरकार कोविड राहत कोष अंतर्गत केला जाणार आहे.
पुढे ते म्हणाले, कोरोनीलमुळे कोरोना रुग्ण बरे होतात असा दावा केला जातो. त्यामुळे हरियाणा सरकार नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या उपचारासाठी कटिबध्द आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारात कोणतीही कमी येऊ नये यासाठी सरकार कायम प्रयत्नशील असणार आहे.