प्रतिनिधी /पेडणे
हळर्ण पंचायत मंडळाने भाजप पक्षात प्रवेश केला असून दि.14 फेब्रुवारी रोजी होणाऱया विधानसभा निलडणुकीत पेडणे मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार प्रवीण आर्लेकर यांना पाठिंबा देत मोठय़ा मताधिक्मयानी निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.
सोमवारी हळर्ण पंचायतीचे उपसरपंच नारायण राऊळ , पंच सदस्य विशाल नाईक, पंच आंतोन रा?ड्रिग्स , पंच रामा हरिजन , पंच दिव्या नाईक व सौ.आश्विनी परब या सहा पंचसदस्यानी तसेच विजय परब यांना भाजपचे उमेदवार प्रवीण आर्लेकर आणि पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस यांनी पक्षात प्रवेश देत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी धारगळचे सरपंच भूषण उर्फ प्रदिप नाईक, तोरसेचे माजी सरपंच तथा विद्यमान पंचसदस्य बबन डिसोझा , सुर्यकांत तोरस्कर , आवेलिन फर्ना?डिस, नरेश कोरगावकर आदी उपस्थित होते.
पक्षाची आणि प्रवीण आर्लेकर यांची ताकद वाढलीः तुळशीदास गावस
यावेळी बोलताना पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस म्हणाले की हळर्ण पंचायत मंडळाने आज योग्य आणि चांगला निर्णय भाजप पक्षात प्रवेश करुन घेतला आहे. आमचा आमदार हा आमचे प्रश्न आणि व्यथा समजवू शकतो ते आमदार झाल्यानंतर सोडवू शकतो.येणाऱया काळात लोकांना जसे पाहिजे तसे काम करणार असून सर्वांनी एकञ येऊन मोठय़ा मताधिक्मयानी निवडून येणार असा विश्वास व्यक्त करत सर्वाचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना माजी सरपंच बबन डिसोझा म्हणाले आज सर्व पंचायत मंडळ एकञ येऊन पाठिंबा दिला यामुळे येणाऱया काही दिवासात अनेकजण भाजापात येणार आसून प्रवीण आर्लेकरा यांचा विजय निश्चित आसल्याचे सांगितले .
यावेळी प्रवीण आर्लेकर यांनी सर्व पंचायत सदस्यांचे अभिनंदन करत हळर्ण पंचायतीने पाठिंबा दिला त्याला ताडा जाऊ न देता त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि गावच्या विकासासाठी नेहमीच पुढे राहणार असल्याचे सांगितले .