समाजसेवक गुरूदास नाईकचे मदतकार्य
प्रतिनिधी /फोंडा
उंडीरöबांदोडा येथील खारपुटीच्या पाण्य़ात मासे पकडण्य़ासाठी लावलेल्या जाळयात अडकलेल्या मगराला जीवनदान देण्यात आले. येथील समाजसेवक गुरूदास नाईक, ग्रामस्थ व प्राणिमित्रांनी अथक परिश्रम घेत फासात अडकलेल्या सुमारे 50 किलो वजनाच्या 7 फुट लांबीच्या मगराला सुटका केली.
प्राप्त माहितीनुसार सदर घटना सोमवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. उंडीर-बांदोडा येथील नारायण नाईक यांच्या मासे पकडण्यासाठी लावलेल्या नायलनच्या जाळय़ात लहान मगरी अडकली होती. एकीचकडे हालचाली करीत असलेले संशयास्पद मगर यांच्या नजरेत पडल्यानंतर जाळयाची दोरी कापून दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर मगराची सुटका करण्यात आली. त्यानंतर पाणिमित्रांना पाचारण करण्यात आले. याकामी स्थानिक समाजसेवक गुरूदास नाईक, नारायण्ग नाईक, पाणिमित्र चरण देसाई, अंकित गावणेकर, मधुराज नाईक यानी अथक परिश्रम घेतले.