लंडन –
ब्रिटनमधील ग्लासगो येथे होणाऱया हवामान बदल विष्घ्यक परिषदेपूर्वी कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केल्याचे पाहायला मिळाले. पारंपरिक इंधनाच्या उपयोगास कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. लंडनच्या प्रमुख व्यावसायिक केंद्राच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने सुरू केली आहेत. संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल परिषदेला कॉप-26 असे नाव देण्यात आले आहे. 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी ही परिषद होणार आहे. विविध नेते पोहचण्याआधी कार्यकर्ते त्याठिकाणी पोहचत आहेत. विरोध करण्यासाठी स्वीडनची पर्यावरण रक्षणासाठी लढणारी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गही दाखल झाली आहे. हवामान बदल रोखण्याच्या प्रयत्नांना समर्थन देणाऱया पर्यावरण प्रेमींनी एकच गर्दी केली होती. जगभरातील नेत्यांनी हवामान बदलाचे संकट गांभिर्याने घ्यायला हवे, असे कार्यकर्त्यांनी आवाहन केले आहे. लंडनमधील प्रमुख बाजारपेठ लॉइडच्या बाहेर कार्यकर्त्यांनी निषेधाला सुरूवात केली आहे. पारंपरिक इंधन वापराच्यासंदर्भात जागतिक संस्थांनी गुंतवणूक बंद करावी, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.