पॅरिस
ब्रेक्झिटनंतर मासेमारी करण्यावरून फ्रान्स आणि ब्रिटन या दोन देशांमध्ये तणाव वाढला असल्याची बाब समोर आली आहे. फ्रान्सने प्रत्युत्तरादाखल योग्य ती कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. येणाऱया काळात हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे मूळ धरू लागली आहेत. यादरम्यान ब्रिटनने फ्रान्सच्या राजदूतांना पाचारण केले आहे.. पण याच्या दोन दिवसांपूर्वी फ्रान्सचे पंतप्रधान जौ कॅस्टॅक्स यांनी सदर वाद सोडवण्यासाठी उभय देशांनी चर्चा करण्याची सूचना केली होती. दोन्ही देशांमध्ये समुद्रात मासेमारी करण्यावरून संघर्ष वाढला आहे. युरोपीय नौकांना परवाना देण्याबाबतच्या नियमावरून दोन्ही देशात वाद पेटला आहे. फ्रान्सने आपल्या नौकांकरता समुद्रात मासेमारी करण्यासाठी परवानगी मागितली आहे. परवानगी न मिळाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही देण्यात आला आहे.