बेळगाव : हस्तशिल्पी संस्थेतर्फे दि. 13 ते 18 ऑक्टोबर दरम्यान मराठा मंदिर येथे सिल्क इंडिया प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात देशभरातील विविध राज्यांमधील सिल्क साडय़ांचा समावेश असणार आहे. टसर, इरी, मलबरी, मुगा या साडय़ांचे नमुने येथे प्रामुख्याने पाहायला मिळतील. बिहार, आसाम, छत्तीसगड या राज्यांमध्ये प्रामुख्याने टसर आणि मुगा सिल्कचे उत्पादन होते. प्रदर्शनात अरिणी सिल्क, जॉर्जेट, शिफॉन, कांजीवरम्, धर्मावरम्, ज्युट सिल्क, ढाका सिल्क, हॅण्डलूम सिल्क, पैठणी, गढवाल, मंगलगिरी, पोचमपल्ली अशा साडय़ांचाही समावेश आहे. याशिवाय प्रिंट साडी, बेड कव्हर्स, डेस मटेरियल, बॉर्डर लाझाज, अपूर्वा सिल्क साडी, गीचा साडी, बुटीक साडी, कांथा साडी, जरदोसी, लखनौ, भागलपूर, सुट्स, प्रेंटेड सिल्क, बनारसी साडी, रेश्मी प्लेन व बुटी साडी, महेश्वरी, चंदेरी, कोटा, टेम्पल बॉर्ड्स व हातमागावर तयार झालेल्या साडय़ा प्रदर्शनात पाहायला मिळतील.
Previous Articleयल्लम्मा डोंगरावरील भग्नप्रतिमांचे संकलन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.