हातकणंगले / प्रतिनिधी
कोल्हापूर शहरातील सदर बाजार येथून पावणेबाराच्या सुमारास एका पांढऱ्या स्वीप्ट मधून दोन लहान मुलांचे अपहरण करून ही गाडी निघाली असल्याची माहिती हातकणंगले पोलिसांना मिळताच त्यांनी प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली दोन शासकीय वाहनांसह हातकणंगले पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करण्यास सुरुवात केली या दरम्यान एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार mh13 BN 62 64 भरधाव वेगाने जात असल्याचे निदर्शनास आले. या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता गाडी भरधाव वेगाने सांगलीच्या दिशेने निघाली. पोलिसांनी तात्काळ या गाडीचा पाठलाग करून मजले फाटा येथे या गाडीला ओव्हरटेक करून ही गाडी थांबवली.
यावेळी या गाडीतून पूजा संदीप इंगळे तिचे साथीदार प्रभाकर राजू शिरसागर , साजन जीवन माने, सुरज बाबासाहेब कांबळे, यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडील दोन लहान मुले सन्मेत इंगवळे ( वय ८ ) श्लोक इंगळे ( वय ४ ) यांना ताब्यात घेतले सदर कारवाईनंतर पुढील कारवाईसाठी शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाईमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधिक्षक प्रणील गिल्डा ,पोलीस नाईक नामदेव कचरे ,पोलीस कॉन्स्टेबल राकेश इंदुलकर, रवींद्र जगताप, दिग्विजय देसाई , सागर पवार, सुहास गायकवाड, किरण पाटील, प्रांजल कांबळे, भूषण शेटे, सुरेश पाटील यांनी भाग घेतला होता