पहिल्याच दिवशी 1500 पेटी आखाती देशांमध्ये रवाना
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शुक्रवारपासून हापूसची परदेशवारी सुरु झाली असून हवाई व सागरी मार्गाने 1500 पेटय़ा दुबई, कुवेत, मस्कत, जीदा, बेहेरीन या आखाती देशामध्ये हापूसची निर्यात झाली आह़े रशिया-युक्रेन युध्दाची झळ काही अंशी हापूसच्या निर्यातीला बसली असली तरी आखाती देशांमध्ये निर्यात होवू लागल्यामुळे निर्यातदारांनी समाधान व्यक्त केले आह़े
मार्चमध्ये सुरु झालेली निर्यात जूनअखरेपर्यंत सरु राहिल, असे एपीएमसी संचालक संजय पानसरे यांनी सांगितल़े शुक्रवारी पाच निर्यातदारांनी सागरी मार्गाने आखाती देशांमध्ये हापूस रवाना केला आह़े रशिया-युक्रेन युध्दामुळे इंधन दरात वाढ झाल्यामुळे याची झळ निर्यातदारांना बसली आह़े परिणामी निर्यातीच्या खर्चात मोठय़ा प्रमाणामध्ये वाढ झाल्याचे निर्यातदारांनी सांगितल़े
या आधी सागरी मार्गाने आखाती देशांमध्ये हापूस पाठवण्यासाठी 3 किलोच्या बॉक्सला 20 रुपये खर्च येत होत़ा तो आता 60 ते 70 रुपये येवू लागला आह़े हवाई मार्गाने 1 किलोसाठी 60 ते 70 रुपये खर्च येत होत़ा त्यात तीनपट वाढ होवून तो 200 रुपयांवर पोहोचला आह़े 3 किलोचा बॉक्स हवाई मार्गाने पाठवण्यासाठी 600 रुपये खर्च येत आह़े या आधी फक्त 180 ते 190 रुपये खर्च येत होता.
250 ते 300 कोटींची उलाढाल अपेक्षित
मुंबईमध्ये दाखल होणाऱया हापूसपैकी 40 टक्के हापूसची निर्यात होत असत़े निर्यात होणारा हापूसचा आकार लहान व मध्यम असत़ो या हंगामामध्ये 250 ते 300 कोटींची उलाढाल अपेक्षित असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आह़े
कोकणातून हापूसची आवक समाधानकारक
मार्चमध्ये सुरु झालेली हापूसची निर्यात जूनअखरेपर्यंत सरु राहिल़ कोकणातून हापूसची आवक समाधानकारक होत असून निर्यातदारांनी हापूसची निर्यात आखाती देशांमध्ये करण्यास सुरुवात केली आह़े