प्रतिनिधी/ रत्नागिरी
सभ्यतेचा आव आणत ‘अप टू डेट’ वेशभूषेतील चोरटय़ांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आह़े लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन विक्रीचे प्रमाण वाढल्याने निवासी इमारती, सोसायटय़ामध्ये अनेक अनोळखी इसमांची ये-जा दिसून येत आह़े याचा फायदा हे चोरटे उठवत असून बंद फ्लॅटची रेकी करण्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आह़े अशा चोरटय़ांना गजाआड करण्यासाठी पोलिसांकडून विविध शक्कल लढवण्यात येत आह़े
शहर तसेच ग्रामीण भागातील सोयायटय़ांमध्ये शिरून हे चोरटे बद फ्लॅट व चोरी करता येईल अशा घरांची रेकी करत आहेत़ यानंतर ते मोक्याच्या वेळी चोरी करून पोबारा करतात़ विशेष म्हणजे आकर्षक पेहराव, अत्तराचा वापर करत सफाईदारपणे हिंदी-इंग्लिशमध्ये ते संभाषण साधत असल्याचे निदर्शनास येत आहे. तमयामुळे त्यांच्याबद्दल कोराच्याही मनात फारसा संशय येत नाही. याच खुबींचा वापर या चोरटय़ाकडून होत आहे.
लॉकडाऊनच्या काळात रत्नागिरी जिह्यात चोऱयांच्या प्रमाणामध्ये घट दिसून आली होत़ी मात्र आता ही परिस्थितत बदलू लागली आहे. ऑनलाईन गंडय़ाची संख्या वाढत असतानाच चोऱयांच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. हे चोरटे जिल्हाबाहेरून येवून चोरी करून पसार होत असल्याने त्यांच्या मुसक्या आवळणे पोलिसांसमोर आव्हान ठरत आले आह़े मे महिन्यानंतर मिशन बिगीन अंतर्गत सीमा खुल्या झाल्यानंतर पुन्हा एकदा जिह्यामध्ये चोऱयांचे प्रमाण वाढले आह़े त्यासाठी चोरटे विविध क्लृप्त्या लढवताना दिसून येत आह़े
उंची कपडे, महागडी गाडी घेऊन जिह्यात आलेल्या या चोरटय़ांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आह़े लवकरच हे चोरटे गजाआड करण्यात येतील असे पोलिसांकडून सांगण्यात आले आह़े दरम्यान लोकांनी आपल्या रहिवासी इमारतीमध्ये संशयास्पद फिरणारी व्यक्ती आढळून आल्यास त्याची सखोल चौकशी करव़ी सोसायटीमध्ये येणाऱया जाणाऱयांची नोंद ठेवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आह़े