प्रतिनिधी/ बेळगाव
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणाऱया संकेश्वर येथील एका वृध्द कैद्याचा रविवारी रात्री मृत्यू झाला आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
बाळकृष्ण आप्पाजी माने (वय 75, रा. संकेश्वर) असे त्या वृध्दाचे नाव आहे. ते संकेश्वर येथील भाग्यलक्ष्मी को-ऑप सोसायटीचे चेअरमन होते, अशी माहिती मिळाली आहे. येथील ग्राहक न्यायालयाने 21 जुलै 2018 रोजी त्यांना शिक्षा ठोठावली होती.
उपलब्ध माहितीनुसार बाळकृष्ण यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाली होती. रविवारी रात्री प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलला हलविताना बाळकृष्ण यांचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी न्यायदंडाधिकाऱयांच्या उपस्थितीत उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी पुढील तपास करीत आहेत.