तिघे जखमी : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार
प्रतिनिधी/ बेळगाव
हिंदवाडी येथे शनिवारी दुपारी विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हाणामारीत तिघे जण जखमी झाले आहेत. चार दिवसांपूर्वी झालेल्या शाळेच्या स्नेहसंमेलनामधील वादावादीचे पर्यवसान शनिवारी हाणामारीत झाल्याचे सांगण्यात आले.
जखमी झालेले विद्यार्थी खासबाग, शहापूर, टिळकवाडी परिसरातील आहेत. शनिवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास टिळकवाडी परिसरातील एका शाळेजवळ ही घटना घडली असून तिन्ही जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.
यासंबंधी शनिवारी रात्री टिळकवाडी पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता अद्याप एफआयआर दाखल झाला नसल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. खासबाग येथील एका शाळकरी मुलाला बॅटने मारहाण केल्याचे सांगण्यात आले. रात्री त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.