मुंबई
एलपीजीसह इंधन क्षेत्रात कार्यरत कंपनी एचपीसीएल अर्थात हिंदुस्थान पेट्रोलियमने ग्राहकांना सोने जिंकण्याची संधी उपलब्ध केली आहे. नवरात्र काळात ग्राहकांना गॅस सिलेंडर खरेदीवर ही ऑफर असणार आहे. पेटीएममार्फत गॅस सिलेंडर बुक करणाऱया ग्राहकांना 10 हजाराचे सोने जिंकण्याची संधी असेल. ही ऑफर 16 ऑक्टोबरपर्यंत असेल, असे कंपनीने म्हटले आहे. दररोज पाच विजेते निवडले जाणार आहेत.