अखिल कर्नाटक खाटिक समाजाची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
अखिल कर्नाटक खाटिक समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी अखिल कर्नाटक खाटिक समाजाने गुरुवारी विधानसौधसमोर आंदोलन छेडून केली.
देशातील इतर राज्यांमध्ये हिंदू खाटिक समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, कर्नाटकात अनुसूचित जातीत समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे समाजातील गरीब कुटुंबीय आणि विद्यार्थी शासकीय सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे या समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा, अशी मागणी अखिल कर्नाटक खाटिक समाजाने केली आहे.
अखिल कर्नाटक खाटिक समाजाचा अनुसूचित जातीत समावेश नसल्याने सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्टय़ा विकास खुंटला आहे. शिवाय समाजाला इतर सुविधांपासून उपेक्षित राहावे लागत आहे. केंद्र सरकारच्या अनुसूचित जातीच्या यादीत समाज 31 व्या क्रमांकावर आहे. या समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा, अशी मागणी संघाने केली आहे.
यावेळी अजित पवार, उदय घोडके, प्रकाश गायकवाडकर, सिद्दू बेन्नाळकर, इंदा जानवेकर, मंगलदास जानवेकर, सतीश घोडके, प्रकाश शारबिदे आदी उपस्थित होते.