अखिल कर्नाटक ग्राम विद्युत प्रतिनिधी क्षेमाभिवृद्धी संघाची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
राज्यात कार्यरत असलेल्या ग्राम विद्युत प्रतिनिधींना नोकरीत कायमस्वरुपी करून समान वेतन द्या, अशी मागणी अखिल कर्नाटक ग्राम विद्युत प्रतिनिधी क्षेमाभिवृद्धी संघाने सोमवारी विधानसौधसमोर आंदोलनाद्वारे केली.
राज्यात सुमारे 18 वर्षांपासून 4 हजार 36 ग्राम विद्युत प्रतिनिधी सक्रियपणे कार्यरत आहेत. मात्र, वीजपुरवठा कंपन्यांचा महसुलाचा मुद्दा उच्च न्यायालयात असल्याने विद्युत प्रतिनिधी अडचणीत आले आहेत. याबाबत ऊर्जामंत्री सुनीलकुमार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, अद्याप समस्या मार्गी लागली नाही. त्यामुळे ग्राम विद्युत प्रतिनिधी वादात सापडले आहेत. याबाबत शासनाने लक्ष घालून ग्राम विद्युत प्रतिनिधींना नोकरीत कायमस्वरुपी करण्याबरोबरच समान वेतन लागू करावे, अशी मागणी अखिल कर्नाटक ग्राम विद्युत प्रतिनिधी क्षेमाभिवृद्धी संघाने निवेदनाद्वारे केली आहे.