गुजरातच्या धोलावीरा मार्गावर जागतिक वारसास्थळ
या वृत्तात दर्शविण्यात आलेले छायाचित्र हे अमेरिकेच्या अलास्कामधील हिमपर्वतांचे नसून गुजरातमधील कच्छचे रणक्षेत्र धोलावीरा येथे जाण्याचा मार्ग आहे. तेथे जमा हा मीठाचा डोंगर आहे. चार महिन्यांपूर्वी धोलावीराला जागतिक वारसास्थळ घोषित करण्यात आले आहे. तेथे जाण्यासाठी भूज भचाऊपासून राप येथे जाणाऱया मार्गाद्वारे धोलावीरापर्यंत पोहोचता येते.
तेथे धडूली सांतलपूर मार्गाचे काम सुरू असल्याने पर्यटकांना 100 किलोमीटर अतिरिक्त प्रवास करावा लागतोय. हा मार्ग निर्माण झाल्यावर पर्यटकांना या जागतिक वारसास्थळापर्यंत पोहोचणे सोपे ठरणार आहे.
देशातील 80 टक्के मिठाचे उत्पादन गुजरातमध्ये होते. राज्यात सुमारे 4,500 एकर क्षेत्रात मिठाचे उत्पादन होते. राज्यात एकूण उत्पादनापैकी कच्छमध्येच 90 टक्के मीठ तयार होते. गुजरातसोबतच राजस्थान, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूतही मिठाचे उत्पादन केले जाते.