ऑनलाईन टीम / शिमला :
हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील लिप्पा संपर्क मार्गावर काल रात्री उशिराने एक अपघात झाला. यामध्ये एक कार 150 मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात गाडीच्या चालकासह चार जणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघाताची माहिती कळताच पोलिसांची टीम तात्काळ अपघात स्थळी पोहोचली आणि त्यांनी मृतदेहांना दरीतून बाहेर काढले. या अपघाताचे कारण अजून कळले नसून, पोलीस शोध घेत आहेत.
मृत झालेले चारही व्यक्ती लिप्पा गावातील असून त्यांची ओळख पटली आहे. यामध्ये जगदीश चंद (37), गंगा सिंह (41), सनम छेरिंग (33) आणि सूरज कुमार (32) यांचा समावेश आहे.
एसएचओ दिलिप चंद यांनी सांगितले की, यातील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गंगा सिंह यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.