प्रतिनिधी/ बेळगाव
तब्बल 49 कोरोना रुग्णसंख्या असलेल्या हिरेबागेवाडीला जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले होते. या गावातून मुतग्याला आलेल्या एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून बुधवारी संबंधित महिलेवर मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 12 मे रोजी हिरेबागेवाडी येथील एक 26 वषीय महिला मुतग्याला आली होती. खरे तर प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना अन्य गावाला जाण्यास प्रशासनाची मुभा नसते. त्यामुळे या महिलेला मुतगा येथे 14 दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते.
14 दिवसांनंतर या 26 वषीय महिलेची क्वारंटाईनमधून मुक्तता करण्यात आली. मात्र, मंगळवारी तिचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे तिला सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. सरकारी नियमांचे उल्लंघन करून प्रतिबंधित क्षेत्रातून अन्य गावाला प्रवास केल्याच्या आरोपावरून तिच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मारिहाळचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. जिल्हय़ात असे अनेक प्रकार घडले आहेत. अहवाल येण्याआधीच क्वारंटाईनमधील नागरिकांची मुक्तता करण्यात आली आहे. नंतर त्यांचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची उदाहरणे आहेत. जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी मात्र सरकारी सूचनेनुसारच आपण त्यांची सुटका केल्याचे सांगत सारवासारव करत आहेत.
प्रतिबंधित क्षेत्रांची यादी जाहीर
कोरोना रुग्णांमुळे जिल्हाधिकाऱयांनी 13 गावांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. बेळगाव, रायबाग, हुक्केरी, चिकोडी तालुक्मयातील ही 13 गावे प्रतिबंधित घोषित करण्यात आली आहेत. हिरेबागेवाडी, कुडची ग्रामीण, सदाशिवनगर, कल्लूर, धोंडगट्टी, चिकोडी, ननदीवाडी, हिरेकुडी, म्हाळेनट्टी, कंग्राळी खुर्द, दड्डी, अगसगा अशी या गावांची नावे आहेत.