प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिह्याता कोरोनाचा प्रवेश केलेल्या हिरेबागेवाडी गावाला डिनोटीफिकेशन करण्यात आले असून गावातील आता बहुसंख्य व्यवहार सुरळीत झाले आहेत. पहिल्याच दणक्यात तीन रुग्ण आढळलेल्या या गावामुळे संपूर्ण जिल्हा हादरला होता. याचबरोबर या गावात सर्वात जास्त रुग्ण सापडले होते. त्यामुळे हे गाव पूर्ण सीलबंद करण्यात आले होते.
कोरोनामुळे हिरेबागेवाडी गाव जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ निर्बंधित प्रवेश म्हणून जाहीर करण्यात आले होते. या गावात तब्बल 49 रुग्ण सापडले होते. येथूनच सर्वात जास्त कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर संपूर्ण जिह्यामध्ये रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. मरकज येथून आलेल्यांना ही लागण झाली होती. त्यानंतर जिह्यामध्ये मोठी खळबळ उडाली होती. आता डिनोटिफिकेशन झाल्यामुळे या गावातील जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.