कर्ले-बेळवट्टी रोडवरील घटना
प्रतिनिधी / बेळगाव
गोमांस वाहतूक होत असल्याच्या संशयावरुन वाहन पेटवून दिल्याची घटना कर्ले-बेळवट्टी रोडवर घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून या घटनेची माहिती मिळताच या परिसरात ती घटना पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने गर्दी होत आहे.
बेळगावमधून मोठय़ा प्रमाणात गोवा राज्याला गोमांस तसेच इतर मांस पुरविण्यात येते. लॉकडाऊनच्या काळात देखील गोमांस वाहतूक करण्यात येत आहे. त्यामुळे काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तशी वाहने पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत. मात्र शुक्रवारी रात्री अज्ञातांनी ते वाहन पेटवून दिले आहे. ही घटना सकाळी उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली आहे.