वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगभरामध्ये हिऱयाची मागणी वाढत असल्यामुळे हिरे व्यापाऱयांनी कर्मचाऱयांसाठी अधिकचा इंसेटिव्ह देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या पॉलिसी शुल्कात जवळपास 5 ते 10 टक्क्यांची वाढ केली आहे. याचा फायदा कर्मचाऱयांना होणार आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेमध्ये एप्रिल ते जूनमध्ये जानेवारी ते मार्च तिमाहीच्या तुलनेत हिरा कटिंग आणि पॉलिश हिऱयाच्या उत्पादनात जवळपास 20 टक्क्यांनी घसरण झाली आहे. उत्पादन घसरल्याने कामगारांची संख्याही कमी झाली होती. पण आता हिऱयाच्या मागणीत वाढ नोंदली जात असून कर्मचाऱयांना थांबवून ठेवण्यासाठी नाना योजना व्यापाऱयांकडून आखल्या जात आहेत.
उत्पादनामध्ये आलेल्या घसरणीमुळे हिरा उद्योगाला पॉलिश करण्यात आलेल्या हिऱयांच्या किमती स्थिर ठेवण्यास मदत मिळाली आहे. येणाऱया महिन्यात जागतिक बाजारात हिऱयाची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेता व्यापाऱयांना कर्मचाऱयांची गरज लागणार आहे. कारण कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे काही कामगार गावी परतले आहेत. ते गेलेले कामगार आता शेतीची खरीपाची कामे संपवून परततील अशी भीती व्यापाऱयांना आहे. परिणामी मागणीच्या काळात कर्मचाऱयांची टंचाई व्यापाऱयांना भासू शकते. यामुळे व्यापाऱयांनी कर्मचाऱयांना अधिकचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.