मुंबई
मुंजाल परिवाराची हिरो सायकल्स कंपनी ऍटलास सायकल्स ही कंपनी खरेदी करणार असल्याचे सांगितले जात आहे. ऍटलास सायकल्स ही देशातील सर्वात जुनी सायकल विक्री कंपनी समजली जाते. एकेकाळी या कंपनीने सायकल विक्री आपले मोठे जाळे निर्माण केले होते. काही दिवसांपूर्वी आर्थिक संकटामुळे या कंपनीचा शेवटचा कारखाना बंद झाला होता. या आर्थिक संकटात सापडलेल्या कंपनीची खरेदी करण्याबाबत हिरो सायकल्स कंपनी उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात कंपनीचे चेअरमन पंकज मुंजाल यांनी ऍटलास सायकल्सच्या प्रवर्तकांसोबत चर्चा सुरू केली असल्याचे सांगितले जाते. हिरो सायकल्सचा बाजारात 43 टक्के इतका वाटा आहे.