पर्यटन येत नसल्याने अनोखा उपकम
मलेशियाच्या कॅमरून हायलँड्स येथील स्थानिक लोकांनी हिल स्टेशनला ग्रीनहाउस फार्ममध्ये रुपांतरित करत शेती करण्यास सुरुवात केली आहे. 38 हजार लोकसंख्या असलेले कॅमरून हायलँड्स मलेशियातील प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. हा भाग चहाच्या मळय़ांसाठी प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी 14 लाख पर्यटक पोहोचायचे. पण कोरोनामुळे तेथे मागील दीड वर्षात पर्यटकांची संख्या कमी होत 1 लाखच राहिली आहे.
याचमुळे तेथी लोकांनी चहाचे मळे सोडून ग्रीनहाउसमध्ये विविध प्रकारच्या भाज्यांचे पिक घेण्यास सुरुवात केली आहे. कॅमरून हायलँड्स व्हेजिटेबल फार्मर ऑर्गनायजेशनचे अध्यक्ष चाई कोक यांच्यानुसार 40 वर्षांमध्ये पहिल्यांदा हिल स्टेशनची स्थिती खराब झाली आहे. महामारीमुळे लोकांचे उत्पन्न घटले आहे. पण या फार्ममुळे आता पूर्वीपेक्षा अधिक नफा मिळवित आहेत.
युनेस्कोच्या यादीत सामील
कॅमरून हायलँड्स हे युनेस्कोच्या वारसास्थळांच्या यादीत सामील आहे. मलेशियात दाखल होणारे 35 टक्के पर्यटक या हिल स्टेशनला पसंती देत असतात. सर्वाधिक पर्यटक जपान, सिंगापूर, थायलंड, सौदी अरेबिया आणि ब्रिटनमधून पोहोचतात.