ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
योगगुरू बाबा रामदेव यांनी ॲलोपॅथीच्या उपचारांवर टीका केल्यानंतर आता थेट डॉक्टरी पेशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊनही एक हजार डॉक्टरांचा मृत्यू झाला. ही कसली डॉक्टरी? असा प्रश्न रामदेव बाबांनी उपस्थित केला आहे.
रामदेव बाबांच्या योगा अभ्यासाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये लोकांशी चर्चा करताना ते म्हणतात, ‘कोरोनाचे दोन डोस घेऊनही एक हजार डॉक्टरांचा मृत्यू झाला. ते स्वत:लाही वाचवू शकले नाहीत, ही कसली डॉक्टरी?’ असा प्रश्न करत त्यांनी डॉक्टरी पेशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. डॉक्टर व्हायचेच असेल तर माझ्यासारखे व्हा. माझ्याकडे कोणतीही डिग्री नाही. तरीही मी सर्वच विषयांचा डॉक्टर आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, यापूर्वी ॲलोपॅथी उपचारांवर टीका करताना ते म्हणाले होते, ‘ॲलोपॅथी मूर्खपणाचं आणि दिवाळखोर विज्ञान आहे. रेमडेसिवीर, फेल झालं, नंतर स्टेरॉईड फेल झाले. आता प्लाझ्मा थेरपीवरही बंदी घालण्यात आली आहे.