हुबळी उपनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद
वार्ताहर /हुबळी
हुबळी-धारवाडच्या सीसीबी पोलिसांनी सोन्याची चोरटी वाहतूक करणाऱया एकाला अटक केली असून त्याच्याजवळील 804 ग्रॅम सोने जप्त केले आहे.
कमरेला वापरल्या जाणाऱया बेल्टमध्ये लपवून सदर सोन्याची तस्करी करण्यात होती. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सुमारे 38 लाख रुपये इतकी होते. याप्रकरणी हुबळीच्या मधुरा इस्टेट येथील रहिवासी चेतन जन्नू याला अटक करण्यात आली आहे.
चेतन जन्नू बेल्टमध्ये लपवून सोने वाहतूक करीत असल्याची माहिती केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पोलिसांना मिळाली. त्यानुसार सीसीबीचे पोलीस निरीक्षक अल्ताफ व त्यांच्या सहकाऱयांनी चेतनला गिरणीचाळ येथे अटक केली. तसेच त्याच्याजवळील 804 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. हुबळी उपनगर पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.