जॅक स्नायडरचा चित्रपट ‘आर्मी ऑफ द डेड’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशी हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा एक धोकादायक जोम्बी थ्रिलर चित्रपट आहे.
या चित्रपटाची चाहते दीर्घकाळापासून प्रतीक्षा करत होते. या चित्रपटात हुमा कुरैशीसह डेब्यू ब्यूटिस्टा, एला पुर्नेल, ओमारी हार्डविक, एना डे ला रेगुएरा, थियो रोसी, मॅथियस श्वेघोफर, नोरा अरनजेर, हिरोयुकी सनाडा देखील आहे.
हुमाने ट्विटरवर चित्रपटाचा ट्रेलर प्रसारित केला आहे. प्रतिभाशाली व्यक्तीच्या दृष्टीकोनातून मला नेहमीच त्यांची चाहती आणि मैत्रिण असल्याचा गर्व आहे. या चित्रपटाचा हिस्सा असल्याचाही अत्यंत गर्व असल्याचे हुमाने म्हटले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप हुमाच्या व्यक्तिरेखेचा खुलासा केलेला नाही.
भूमी पेडणेकर, आकांक्षा रंजन कपूर, फराह खान आणि अनेक अन्य कलाकारांनी ट्रेलरमधील हुमाची झलक पाहून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. हुमासह भारतातील अन्य कलाकारही हॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
धनुष हा रुसो ब्रदरच्या ‘द ग्रे मॅन’मध्ये दिसून येणार आहे. फरहान अख्तर मार्वल सीरिजच्या ‘मिस मार्वल’मध्ये विशेष भूमिकेत आहे. अली फजलने ‘द डेन ऑन द नाइल’ तर प्रियांका चोप्रा हिने ‘मॅट्रिक्स 4’मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. आमी ऑफ द डेड चित्रपट 21 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.