नवी दिल्ली
कृषी रसायन क्षेत्रातील कंपनी हेरंबा इंडस्ट्रीजचा आयपीओ येत्या 23 फेब्रुवारीला बाजारात येणार आहे. या इश्युत 25 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. गुजरातच्या या कंपनीकडून 625 कोटी रुपये आयपीओच्या माध्यमातून उभारले जाणार आहेत. कंपनीने इश्यूची किंमत 626 ते 627 रुपये इतकी ठेवली आहे. गुंतवणूकदारांना कमीत कमी 23 समभागांवर बोली लावता येणार आहे. यातील बाबू शेट्टी व विठ्ठल भंडारी प्रत्येकी 40 हजार समभागांची विक्री करणार आहेत. पीक सुरक्षेसंबंधी रसायन बनवणे, निर्यात करणे व विपणन करण्याची कंपनीची सेवा आहे.