प्रतिनिधी/ बेळगाव
हेस्कॉमच्या खानापूर येथील कार्यालयात गुरुवारी हेस्कॉम कर्मचाऱयांचा निवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. ऑपरेटर व्ही. जे. बिर्जे, ऑपरेटर एम. ए. कुंडेकर व हलशी सेक्शनचे लाईनमन टी. ए. पाटील यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.
सेक्शन ऑफिसर केंचप्पा, व्ही. एच. चक्रीमठ, मंजुनाथ बजंत्री, विजारे, जावेद नाईकवडी, कृष्णा दिवटगी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्ही. जे. बिर्जे व एम. ए. कुंडेकर 37 वर्षे तर टी. ए. पाटील 36 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. यावेळी त्यांचे कुटुंबीय, कर्मचारी, युनियनचे पदाधिकारी, प्रगतशील पॅनलचे सदस्य उपस्थित होते.