प्रतिनिधी/ बेळगाव
उचगाव ग्राम पंचायतच्या वॉर्ड क्र. 5 मधील विजयी झालेले बळवंत जयवंत पावशे यांचा कै. नारायणराव जाधव शैक्षणिक-सामाजिक ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला.
ट्रस्टचे संस्थापक नेताजी जाधव, अध्यक्ष मालोजी अष्टेकर, खजिनदार श्रीधर उर्फ बापू जाधव, सुमंत जाधव, किशोर पावशे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. मराठी भाषा व संस्कृतीच्या जपणुकीसाठी कार्यरत राहून उचगावमधील सर्व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच बळवंत पावशे यांना प्रशासकीय कामाचा अनुभव असल्याने सरकारच्या विविध योजनांचा लाभ जनतेला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी आशा व्यक्त करण्यात आली.
यावेळी बोलताना बळवंत पावशे म्हणाले, मी एमएससी उत्तीर्ण असून, माझ्या ज्ञानाचा उपयोग इतरांना करून देईन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.