नवी दिल्लीः
होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया यांनी आपली नवी दुचाकी सीबी 300 आर ही बाजारात दाखल केली असून जिची एक्स शोरूम दिल्ली किंमत ही 2 लाख 77 हजार रुपये इतकी असणार आहे. सदरच्या गाडीच्या बुकिंग प्रक्रियेला सुरूवात झाली असून हेंडाच्या प्रिमीयम बिगविंग आणि बिगविंग टॉपलाइनच्या विक्री केंद्रावर गाडी बुक करता येणार आहे. 286 सीसीचे चार वॉल्वचे लिक्वीड सिंगल सिलेंडर इंजिन याला असून असिस्ट आणि स्लिपर क्लचची सुविधा यात असेल.