ऑनलाईन टीम / मुंबई :
कार्डेलिया ड्रग्ज पार्टी प्रकरणाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने वेगवेगळे आरोप होत आहेत. रविवारी या प्रकरणात पंच प्रभाकर साईल याने वानखेडे यांच्यावर लाचखोरीचे आरोप केले होते. त्यांनतर आज खारघर येथील एका ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार शेखर कांबळे याने मोठा खुलासा केला आहे.
खारघरमध्ये एका नायजेरीयन व्यक्तीला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात कारवाईवेळी समीर वानखेडे यांनी माझ्याकडून 10 ते 12 कोऱ्या कागदांवर सह्या घेण्यात आल्या आणि त्याचा वापर पंचनामा म्हणून केला. तसेच मी काल टीव्हीवर खारघरच्या केसचाही उल्लेख झाल्याचे पाहिले. त्यानंतर मी घाबरलो. मला अनिल माने नावाच्या एका एनसीबी अधिकाऱ्याचा फोन आला. त्यांनी घडलेल्या प्रसंगाची कुणालाही माहिती न देण्यास सांगितलं, असा दावा शेखर कांबळे यांनी केला आहे. कांबळे यांनी यावेळी समीर वानखेडे यांच्याही नावाचा उल्लेख केला आहे.