बेळगाव शहर देवस्थान मंडळाचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
यंदाची होळी व रंगपंचमी आपल्या घरामध्येच साजरी करावी, असे आवाहन बेळगाव शहर देवस्थान मंडळाने केले आहे. याबाबत मंडळाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोरोना संसर्गजन्य रोगामुळे आरोग्याला पुन्हा धोका निर्माण होण्याचा संभव आहे. होळी हा आपल्या हिंदू वर्षातील शेवटचा सण आहे. दरवषी बेळगावकर उत्साहाने सण साजरा करतात. परंतु यंदा मात्र काळजी घेणे आवश्यक आहे.
खबरदारी म्हणून एकूण परिस्थिती लक्षात घेता, कोणीही धोका न पत्करता आपल्या घरापुरताच घरच्या घरी हा सण साजरा करावा, आपल्या गल्लीमध्ये किंवा प्रभागामध्ये डॉल्बी लावून नाचगाणी करू नयेत, एकत्र येण्याचे टाळावे व कोरोनाचे नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रणजीत चव्हाण-पाटील, सचिव परशराम माळी यांनी केले आहे.