रविवार दि.28 मार्च ते 3 एप्रिल 2021
मेष
या सप्ताहात मीनेत बुधप्रवेश, चंद्र, गुरु त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात वाद वाढवू नका. उधारी वाढवू नका. हिशोबात गोंधळ होईल. वस्तू सांभाळा. नोकरीत कामाचा ताण होईल. डोळय़ांची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे एखादे गुपित उघड होण्याची शक्मयता आहे. भरंवशाच्या व्यक्ती धोका देऊ शकतात. तरीही प्रश्न सोडवता येईल. संसारात खर्च वाढेल. नाराजी होईल.
वृषभ
या सप्ताहात मीनेत बुधप्रवेश, सूर्य, शनि लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. मागील येणे वसूल करा. कायद्यात राहा. रागावर ताबा ठेवा. नवे काम मिळवा. ओळखी वाढतील. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती होईल. नोकरीतील कामे रेंगाळत ठेवू नका. संसारात आनंदी रहाल. धावपळ होईल. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्व वाढेल. शिक्षणात मेहनत घ्या. यश मिळेल.
मिथुन
या सप्ताहात मीनेत बुधप्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात सुधारणा होईल. कोणताही वाद वाढवू नका. कायद्याचे पालन करा. वसुली करा. प्रवासात घाई करू नका. नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील. परंतु प्रयत्नाने, नम्रपणाने यश खेचावे लागेल. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती होईल. योग्य व्यक्तीचेच ऐका. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे.
कर्क
या सप्ताहात मीनेत बुधप्रवेश, शुक्र, शनि लाभयोग होत आहे. नवीन ओळखी होतील. त्यातून काम मिळण्याची शक्मयता आहे. प्रयत्न करा. कला क्षेत्रात विशेष यश मिळेल. प्रसिद्धी मिळेल. नोकरीत कठीण कामे करून घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात योजनांच्याकडे लक्ष द्या. भाषणात प्रभाव पडेल. संसारात चांगली बातमी मिळेल. शिक्षणात यश मिळेल.
सिंह
या सप्ताहात मीनेत बुधप्रवेश, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. धंद्यात दुर्लक्ष करू नका. नवीन ओळखीवर भाळून जाऊ नका. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. नोकरीत तणाव होईल. कामात चूक करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील. आरोप येईल. कठोर बोलणे टाळा. कायद्याला धरून कृती करा. करारात फसाल. संसारात खर्च वाढेल. वाद होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यास आळस करू नये.
कन्या
या सप्ताहात मीनेत बुधप्रवेश, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. प्रत्येक दिवसाला महत्त्वाची कामे करून घ्या. धंद्यात वाढ होईल. फायदा वाढेल. जुने येणे वसूल करा. नोकरीत मर्जी राखता येईल. कामे रेंगाळत ठेवू नका. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती होईल. दौऱयात यश मिळेल. प्रश्न वेळच्या वेळी सोडवा. कला, क्रीडा, शिक्षण, साहित्यात पुढे जाल. चांगली संगत ठेवा.
तुळ
मीन राशीत बुधप्रवेश, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. होळी, धुलीवंदन यादिवशी चूक करू नका. नियमांचे पालन करा. रागावर ताबा ठेवा. समस्या कधीही वाढू शकते. धंद्यात गोड बोला. फसगत टाळा. व्यसन नको. नोकरीच्या कामात लक्ष द्या. चूक टाळा. राजकीय, सामाजिक कार्यात नम्रता ठेवा. तुमच्यावर आरोप येईल. स्पर्धा कठीण आहे. शिक्षणात आळस करू नका.
वृश्चिक
मीन राशीत बुधप्रवेश, सूर्य, शनि लाभयोग होत आहे. धंद्यात लवकर प्रश्न सोडवा. वसुली करा. नवे काम मिळवा. नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल. प्रवासात नवीन ओळखी होतील. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक कार्यात सर्व प्रश्नावर नीट लक्ष द्या. समस्या रेंगाळत ठेवू नका. घरातील कामे करून घ्या. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल. शिक्षणात मेहनत घ्या.
धनु
मीन राशीत बुधप्रवेश, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. साडेसाती सुरू आहे. क्षुल्लक गैरसमज होतील. भावनेच्या आहारी न जाता कामे करा. धंद्यात कामे मिळतील. कायद्याचा त्रास सप्ताहाच्या शेवटी होईल. नोकरीत कामाचा ताण असेल. तुमचा प्रभाव टिकवता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात तत्परता ठेवा. चौफेर सावध रहा. अति विश्वास कुणावर ठेवू नका. शिक्षणात मेहनत घ्या.
मकर
या सप्ताहात मीन राशीत बुधप्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात वाढ होईल. कोणतीही समस्या सोडवण्याचा मार्ग शोधता येईल. वसुली करा. मोठे काम मिळेल. नोकरीत वरि÷ांना खूष कराल. संसारात सुखद समाचार मिळेल. राजकीय, सामाजिक कार्याला नवे वळण मिळेल. तुमचे महत्त्व वाढेल. कठीण कामे करून घ्या. कला, क्रीडा साहित्यात प्रसिद्धी मिळेल. शिक्षणात मागे राहू नका.
कुंभ
या सप्ताहात मीनेत बुधप्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. होळी, धुलीवंदनाच्या दिवशी अतिरेक कुठेही करू नका. कायदा मोडू नका. धंद्यात वाढ होईल. जुने येणे वसूल करा. नोकरीत तुमचे महत्त्व पटवून देता येईल. राजकीय, सामाजिक कार्याला नवे वळण मिळेल. सावधपणे निर्णय घ्या. नवीन परिचय होतील. कला, साहित्यात प्रगती कराल. शिक्षणात आळस करू नका.
मीन
या सप्ताहात तुमच्याच राशीत बुधप्रवेश, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात सुधारणा होईल. समस्या लवकर सोडवा. नवे काम मिळवा. जुने येणे वसूल करा. ओळखी वाढतील. नोकरीत कामे करून ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात योजना वेळेवर पूर्ण करा. प्रति÷ा वाढेल. जनसंग्रह वाढेल. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल. शिक्षणात कष्ट घ्या. घरात शुभ समाचार कळेल.