प्रतिनिधी / आटपाडी
आटपाडीतील सोमनाथ जाधव यांचा १६ लाख रुपये किमतीचा बकरा अखेर सापडला. बकऱ्याची चोरी करणारे तीन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून हा बकराही पोलिसांनी हस्तगत केला. बकरा आणि त्याची चोरी उजेडात आल्यामुळे आनंदित झालेल्या मेंढपाळांनी आटपाडी पोलिसांचा गौरव केला. गुलाल उधळत आणि फटाक्यांची आतषबाजी करत आटपाडी शहरातून बकऱ्याची वाजत गाजत मिरवणूक काढली.