जिल्हय़ात एकूण 18 हजार 514 रुग्ण कोरोनामुक्त : नव्याने 561 कोरोना बाधित : आठजणांचा मृत्यू
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
‘रेड झोन’मध्ये गेलेल्या सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना बुधवारी मात्र बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱया रुग्णांची संख्या दुप्पट होती. एकाच दिवशी विक्रमी 1 हजार 33 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज दिला गेला आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येने एकाच दिवशी डिस्चार्ज मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे जिल्हय़ात आतापर्यंत एकूण 18 हजार 514 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्हय़ात 4 हजार 635 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्हय़ात गेल्या दोन महिन्यांत 16 हजाराहून जास्त कोरोना बाधित आढळले आहेत. ही रुग्ण संख्या प्रचंड वेगाने वाढत असताना बरे होणाऱया रुग्णांची संख्या तेवढय़ा प्रमाणात वाढत नव्हती. त्यामुळे सक्रिय रुग्ण संख्या वाढत चालली होती. बुधवारी मात्र बरे होणाऱया रुग्णांचा विक्रम झाला. एका दिवसात 1 हजार 33 रुग्ण कोरोना मुक्त झाले.
दरम्यान बुधवारी नव्याने 561 कोरोना बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना बाधित एकूण रुग्णांची संख्या 23 हजार 783 झाली आहे. तसेच जिल्हय़ात आणखी आठजणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत 628 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
366 रुग्णांची प्रकृती चिंताजनक
कोरोना बाधित रुग्णांमधून 366 जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यातील 318 रुग्ण ऑक्सिजनवर, तर 48 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत असल्याची माहिती देण्यात आली.
तालुकानिहाय बुधवारचे पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड – 51, दोडामार्ग – 33, कणकवली – 93, कुडाळ – 138, मालवण – 60, सावंतवाडी – 120, वैभववाडी – 28, वेंगुर्ले – 38.
तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड – 2702, दोडामार्ग – 1552, कणकवली – 4876, कुडाळ – 4741, मालवण – 3015, सावंतवाडी – 3533, वैभववाडी – 1144, वेंगुर्ले – 2044, जिल्हय़ाबाहेरील – 146.
तालुकानिहाय सक्रिय रुग्ण : देवगड – 498, दोडामार्ग – 368, कणकवली – 737, कुडाळ – 970, मालवण – 851, सावंतवाडी – 709, वैभववाडी – 173, वेंगुर्ले – 313, जिल्हय़ाबाहेरील – 16.
तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू : देवगड – 78, दोडामार्ग – 18, कणकवली – 133, कुडाळ – 92, मालवण – 97, सावंतवाडी – 107, वैभववाडी – 46, वेंगुर्ले – 55, जिल्हय़ाबाहेरील – दोन.
आरटीपीसीआर आणि ट्रुनॅटटेस्ट तपासलेले नमुने – आजचे 1274, एकूण 91,911, पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 17,166. ऍन्टिजन टेस्ट – तपासलेले नमुने आजचे 1217, एकूण 51,230, पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 6,715.
आणखी आठजणांचा मृत्यू
कोरोनाने आणखी आठजणांचा मृत्यू झाला. त्यात कणकवली-हरकुळ येथील 65 वर्षीय महिला, फेंडाघाट येथील 65 वर्षीय महिला, कसवण येथील 65 वर्षीय पुरुष, कुडाळ-नेरुर येथील 73 वर्षीय पुरुष व नेरुर येथीलच 48 वर्षीय पुरुष, देवगड-तिर्लोट येथील 52 वर्षीय पुरुष, देवगड येथील 77 वर्षीय पुरुष, सावंतवाडी-माजगाव येथील 50 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.